नाथां बद्दल माहिती:-

मल्हारदादा व मथुराबाई या धर्मप्रवण दाम्पत्याच्या पोटी श्री माधवनाथांचा जन्म झाला त्याच्या जन्मानंतर लवकरच मल्हारदादांचा मृत्यू झाला.१३ वर्षाच्या माधवाने आसेतु हिमाचल यात्रा केली व ६ वर्ष हिमालयात तपश्चर्या केली.नंतर तो करवीला आला. माधवाने अनेक चमत्कार करून दाखविले होते त्यामुळे अनेकांची त्यांच्यावर श्रद्धा बसली आणि माधवाचे श्री माधवनाथ महाराज झाले. भारतीय संतांच्या परंपरेतील सिद्धपुरुष,चित्रकुटचे(उत्तर प्रदेश) नाथसंप्रदायी मठाचे अधिकारी योगाभ्यानंद सद्गुरू माधवनाथ महाराज(मार्च १८५७ ते मार्च १९३६) यांचे स्थान मोठे आहे. माधवनाथांचे मुळ गाव नाशिक जिल्ह्यातील नाशिक-शिर्डी रस्त्यावरील पांगरी(ता. सिन्नर) हे होय. जगाच्या पाठीवर अलौकिक दैवी सामर्थ्य असणाऱ्या व्यक्ती आज ही आहेत,अशा वंदनीय पुरुषात योगाभ्यानंद श्री माधवनाथ महाराज यांची गणना होते.ते नाथ पंथांपैकी एक साक्षात्कारी श्री नाथ होते. मुळचे त्यांचे घराणे सिन्नर तालूक्यातील मौजे पांगरी हे आहे. वयाची पहिली १० वर्ष त्यांनी पांगरी येथे काढली.पांगरी येथील काशिनाथ मंदिर हे महाराजांचे उपासना स्थान होय.

कवी सुधाकर बोरकर ,नागपूर यांनी स्वरचित कवितेतून भूमिपूजन कार्यक्रमासाठी श्री बाळासाहेब जोशी यांना दिलेल्या शुभेच्छा.

मंदिरात साजरे होणारे वार्षिक उत्सव

नाथषष्ठी

नाथषष्ठी म्हणजे नाथांचा निर्वाण दिवस.नाथषष्ठी हा मार्च महिन्यात साजरा होतो.

पाडवा(चैत्र शुद्ध प्रतिपदा):

पाडवा म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदा या दिवशी नाथ महाराजांचा जन्म झाला.

दत्तजयंती:

दत्तजयंती डिसेंबर महिन्यात साजरी होते.दत्तजयंतीच्या आधी ३ दिवस मंदिरात गुरुचरित्राचे पारायण होते.

गुरूपोर्णिमा:

गुरूपोर्णिमा दर वर्षी आषाढ महिन्यात येते

वर्धापनदिन:

वर्धापनदिन दर वर्षी वैशाख महिन्यात येते

श्रावण वदय अष्टमी(कृष्ण जन्म):

दरवर्षी नाथ मंदिरात कृष्ण जन्म साजरा केला जातो.

Visting Count :