दीपप्रकाश किरण माहिती


श्री गुरुदेव दत्त महाराज नाथांसह

उज्जनला श्रावणी सोमवारी आजोबांकडे आलेल्या महंताना चि.सौ. मथुराने नमस्कार केला.त्यांनी तिला,”तू सिद्धमात्ता होशील.तुला अनेक पुत्र होतील,त्यातील एक पुत्र अलौकिक असा लोकोद्वारक होईल”, असा आशीर्वाद देऊन,नित्य पूजेसाठी महादेवाची पिंड दिली.

व्रतबंध झालेला आठ वर्षाचा माधव,पांगरीच्या महादेव मंदिरात सवंगड्यांना घेऊन ”हर हर महादेव” असे म्हणत प्रदक्षिणा घालायचा.”ओम नम शिवाय” मंत्राघोष ही करायचा आणि कित्येक वेळा स्वतः एकांतात बसून समाधीसुखात तन्मय व्हायचा.




संतश्रेष्ठ यशवंत देव मामलेदार यांच्या दर्शनासाठी मथुराबाई लहानग्या माधवला घेऊन या गावी आल्या.तिथे येताच स्वतः देव महाराज पत्नीसह त्यांच्या स्वागतासाठी सामोरे गेले.त्यांच्या दर्शनासाठी ओढ लागलेला माधव त्यांच्या पायाशी नतमस्तक झाला.

चित्रकुट-करवीच्या नाथ पिठाचा वारस म्हणून ग्रामपंचानी माधवाला गादीवर बसवले.त्या नंतर त्याने कौपिन धारण करून मंदिराच्या तळ घरातील गुप्तनाथांच्या समाधी पाशी अनुग्रह घेतला.नंतर माधव नाथ सिद्धयोगी होऊन बाहेर आले.त्या वेळी लोकांनी त्यांचा जय जयकार केला.

करविला पयोष्णी नदीच्या तीरावर एक बैल अंतकाळाच्या वेदनांनी तडफडत होता.महाराजांना त्याची दया आली आणि त्यांनी बैलाला थापटी मारून आशीर्वाद दिला,”अजून ५ वर्ष जिवंत राहा”


करविला पयोष्णी नदीच्या तीरावर एक बैल अंतकाळाच्या वेदनांनी तडफडत होता.महाराजांना त्याची दया आली आणि त्यांनी बैलाला थापटी मारून आशीर्वाद दिला,”अजून ५ वर्ष जिवंत राहा

अज्ञातवासात पोहरेगावी महाराज धोंड्या झाले.मचाणावर बसून भजने गात शेताची राखण करायचे. एकदा भजनरंगात दंग्ग झाले असताना,शेतात माजलेला पोळ घुसला आणि त्याने उभे पिक फस्त केले

वृध्द झालेल्या मथुरा मातेने माधवाला भेटायचा एकच ध्यास घेतला होता. हे अंतर्दृष्टीने उमजून श्री नाथ,मातेला भेटायला देवगावला आले.दोन तपांनी भेटलेल्या आपल्या मुलाला पाहून मातेने पाहताक्षणी ओळखले.पुत्र विरह संपला.भेटीचे आनंदाश्रू तरळले.


लासूरला लाक्षयानी देवीच्या मंदिरात साधू गंगागीर बुवांनी मान भजनाचा थाट मांडला होता.हे पाहताच श्री माधवनाथ महाराजांनी मृदंग वाजवाय घेतला आणि अभंग गायला.

नाशिकला लक्ष्मीनारायणाच्या मंदिरात श्री नाथांच्या अज्ञातवासाची सांगता झाली.स्वामी चीत्घनानंद आणि गंगागीर बुवांनी श्री नाथांचाचा गंध, वास्त्रालान्कारणी सजवले.त्या पीत वस्त्रांनी जणू राजयोगाचा जिव्हाळाच प्रकट झाला.

शिवलाल दादांच्या चावऱ्या कुत्र्याची वृत्ती सात्विक व्हावी म्हणून महाराजांनी स्वताच्या हातांनी कुत्र्याच्या गळ्यात झेंडूची माल घातली आणि समजावले “केवळ भुंकून घर राखाव, तामसी स्वभाव सोडून द्यावा.” कुत्र्याने ही मान हलवून मान्यता दिली.


परमहंस गोपालदास नाशिकला काळाराम मंदिराच्या पूर्वद्वारात धुनी पेटवून राहायचे.एकदा श्री माधवनाथ महाराज गोपालदासना भेटायला आले त्या वेळी गोपालदासनी मांडीवर थाप ठोकली, श्री नाथांनी दंड थोपटले.हाच या एकात्म झालेल्या संतांचा निशब्ध असा गोड संवाद झाला.

देवगावला उखीरडा असलेल्या जमिनीवर बसून महाराजांनी भविष्यवाणी वर्तविली,” येथे पश्चिमीमुख व्यंकटेश मंदिर होईल.श्री व्यंकटेश येथे चित्रकुट प्रमाणेच सर्वत्र लीला करतील”, त्याच वेळी पाण्याचे भरलेले घडे घेऊन दोन सुवासिनी आल्या,शुभशकून झाला, कामाचा प्रारंभ झाला.

पुण्याच्या भाविक शिष्या लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई यांना, पती निधनानंतर सहस्त्रावधी धनाचा योग्य विनियोग’ करायचा होता. महाराजांनी त्यांना बुधवार पेठेत दत्तमंदिर बांधायला सांगितले.ते कार्य पूर्णही करून दिले लक्ष्मीबाईच्या हातून परमार्थ घडवला.


ध्यानयोगाचा अभ्यास म्हणजे सलोकता मुक्तीची साधना .महाराजांनी बाळा नाईकांना सगुण ध्यानाचा मार्ग दाखवला. त्यांनीही निष्ठेने अभ्यास केला.बाळा नाईकांच्या हृद्दयावर श्री नाथांची गोजिरी मूर्ती उमटली.हा चमत्कार सर्वांनी पहिला.

महाराज पलूसला धुंडिराज साधूंना भेटले. महाराजांना पाहून धुंडीबुवांना बडे सरकार आल्याचा खूप आनंद झाला. पाहुणचार करण्यासाठी त्यांनी आपल्या झोळीतून बाजरीची शिळी भाकरी काढून त्या वर चटणी ठेऊन महाराजांना जेवायला सांगितले.महाराज ही तेवढ्याच प्रेमाने जेवले.

संतांचे राज्य मुक्तीची नागरी म्हणजे पंढरपूर.महाराज आषाढी यात्रेला पंढरपूरला आले प्रथम विठ्ठल दर्शनासाठी देवळात आले आणि विठ्ठलाशी एकरूप झाले.


तात्यासाहेब वानवळे वाणीला देवीच्या गडावर जेवत असताना एक कुमारीका आपल्याच पानात जेवत असल्याचे दिसले. तेव्हा तात्यांनी आचाराला विचारले “ही कोण बालिका? माझ्या ताटात का जेवत आहे?” आचारी म्हणाला “इथे बालिका नाहीये”,तात्यांना ध्यानात आले ही तर देवीच आपल्या पानात जेवते आहे.

शिष्योत्तम तात्यासाहेब वानवळे यांनी एकदा नाथ पदावर माथा टेकताच महाराज म्हणाले,”हे कसले नमन?नमनाने निर्मन झाले पाहिजे.” तात्यासाहेबांनी ,”वंदन कसे करायचे?” विचारल्यावर महाराजांनी तात्यांची पाऊले पुढे ओढून,स्वतः त्यांच्या पायावर नतमस्तक होऊन नमनाचे प्रात्यक्षिक दाखवले.

महाराज नाशिक जवळ भागुरला आले. तेथे आपल्या भूकू या मुलाला घेवून त्याचे आई वडील आले.नामात रंगलेला,सात्विक,विरागी भिकू त्यांना “वेडा भिक्या” वाटत होता.महाराजांनी आश्वासन दिले,”भिकू वेडा नाही.तो प्रपंचा करून परमार्थ साधेल.


सद्गुरू भेटावा म्हणून अनेक वर्षे तळमळणारे विनायकराव देव यांना अखेर दृष्टांत देवून महाराजांनी बोलावून घेतले. पत्नी आणि सासूबाईनी योगदीक्षा घ्यायला खूप विरोध केला.पण श्री नाथांनी त्यांच्या संसाराची जबाबदारी स्वीकारली.दोघींची मान्यता घेतली आणि नाशिकला दीक्षाविधी पार पाडला.

श्री नाथ सद्गुरुंनी विनायाकांना हटयोगातील षटचक्रांची माहिती दिली.

महाराज विनायानकाच्या घरी येणार होते.महाराजांना दुध आवडते ते त्यांना द्यायचे असे विनायकांनी ठरवले.पण अचानक म्हैस आटली. दुध देईना. मग महाराज स्वताच आले आणि त्यांनी दिव्य दृष्टीने पाहताच म्हशीला तत्काळ पान्हा फुटला.


शिष्य वासुदेवांनी ज्ञानेश्वरी वाचण्याचा आपला नित्यनेम पूर्ण करावा म्हणून महाराज स्वतः गोपालदास,शीलनाथ,गजानन महाराज, साईनाथ आणि धुंडिराज या आपल्या जिव्हाळाच पंचायतानासह श्रोते म्हणून ज्ञानेश्वरी ऐकायला बसले.

शिष्याश्रेष्ट विवेक म्हणंजे वासुदेव गणेश थत्ते यांच्या नांदगाव च्या महादेव बागेतील घरात घडलेला हा चमत्कार त्यांची एक कन्या मथुरी काळाने हिरावून नेली.माता पित्यांचा शोक अनावर झाला.अशावेळी महाराज त्यांच्यासमोर प्रत्यक्ष माथुरी होऊन प्रकट झाले.

श्री नाथांनी वासुदेवाना न्यानयोगाचा विवरण करून सांगितले.प्रपंच परमार्थ,ब्रम्ह-माया,मायेचे व्यापक स्वरूप,मायेतून सुटण्यासाठी साधन चतुष्ट,तसेच साधकाने अभ्यास कसा करावा ते सांगितले.आत्मज्ञान सध्या करण्यासाठी परमार्थाचे मुख्य ग्रंथ ज्ञानेश्वरी आणि एकनाथी भगवान श्री नाथांनी वासुदेवांना दिले.


“लंगोटी लावून भिक्षा मागत फिरणारे आम्हीच खरे राजयोगी आहेत.अस सांगणाऱ्या दोन पोटार्थी साधूंनबरोबर महाराज त्यांचा चेला होऊन त्याच वेशात निघाले.साधू बैलगाडीत आणि अयाचित वृत्तीचे महाराज पायी! असा इंदोर ते देवास प्रवास त्यांनी केला.

मूर्तिमंत भक्ती अशा गोदामाईना महाराज आपल्या पित्याकडे आल्याचे समजले.भोसेगावी जाऊन श्री नाथांचे दर्शन घेईपर्यंत त्या पूर्ण उपाशी राहिल्या.ते उमजून महाराजांनी त्यांना वास्तल्याने गुलाबाची फुले प्रसाद देऊन “प्रपंच परमार्थाचा आधार अशा देहाला विनाकारण दंड देऊ नको”.असा उपदेश केला.

आयुष्यभर धर्माचरणात राहिलेले नाथसुतांचे वडील नारायणराव कुलकर्णी शांती परमार्थासाठी नाथपायाशी आले.महाराजांनी त्यांना जीवाचा ,गर्भावस्ता, व जन्मापासून मृतुपर्यान्ताचा प्रवास कसा होतो हेय सांगून,या महादुखाचे निरसन करण्यासाठी वैराग्याचा अवलंब करायला सांगितले.


देवगाव रंगारी येथे महाराजांनी चार बालकांना आपल्यासमोर आसनात बसवून, दोन भुवयांच्या मध्यावर दृष्टी स्थिर करायला सांगितले आणि काय आश्यर्य चारही बालकांनी क्षणार्धात समाधी लागली.

जळगावला नाथसुतांचे बंधू कृष्णराव यांना अनुग्रह देताना महाराजांनी त्यांना यांम नियम पाळून निष्काम भक्तिमार्गाने जाण्याचा उपदेश केला.

श्रवण, कीर्तन, स्मरण, चरणसेवा,अर्चन, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन अशा नवविधा भक्तीने साधकाला सायुज्यमुक्ती मिळते असे समजवून सांगितले.

नाथांचा अनन्य भक्त कृष्ण याने अंतकाळच्या आजारात विभूती सेवन व जयनाथ नामोच्चार अखंड चालू ठेवला. अखेर नाथभेटीच्या ध्यासात प्राण सोडला.महाराज त्वरित आले.आई ने कृष्णा म्हणून टाहो फोडला.मृतूनंतरही कृष्णाने डोळे उघडले आणि श्री नाथांकडे पहिले.श्री नाथभेटीची इच्छा पूर्ण झाली.


रणछोडदासांची पत्नी आपल्या लहानग्या मुलाला कडेवर घेऊन धरणगाव स्टेशन वर उतरली.मध्यरात्र झाली होती. पेटी उचलायला हमाल येईना .तेव्हा हतबल झाल्याने तिने भक्तिभावाने श्री नाथांचा धावा केला आणि स्वतः श्री नाथच हमालाच्या वेषात तिच्या मदतीला धावून आले.

मुहूर्थ कार्याचे महत्व दाखवण्यासाठी सोलापूरला महाराजांनी आप्पा वारद या भक्ताकडे एक खोली बांधली .खरेदीपासून बांधकामाचे प्रत्येक काम मुहुर्थ पाहून केले आणि शेवटी त्या नव्या घरात गवत भरून स्वतःच आग लावली.पण फक्त गवत पेटले.मात्र घर तसेच्या तसे कोरे करकरीत राहिले.

नांदगावला महादेव आश्रमात वासुदेव हवन करत होते.तिथे आलेल्या भिक्षुकाला अग्निकुंडामध्ये,गंगाजलात तेजस्वी शाळीग्राम तरंगत आहे असे दृश्य दिसले.तो घेण्यासाठी त्याने अग्निकुंडात हात घातला.पण हात भाजला.वासुदेवांनी विभूत्ती उपचार केले.सद्गुरूंचे सामर्थ्य पाहून तो प्रभावित झाला.


अन्यायाने अफाट धनसंग्रह करणाऱ्याला जणगावच्या दगडू नागेश सावकारचे मृतुनंतर पिशाच्च झाले.घरापाशी फिरकनार्याना तो पिडा देऊ लागला.नाथ शिष्य गणेश दामोदर याला बाधामुक्त करण्यासाठी श्री नाथांनी तेथे शतचंडी हवन करविले.पिछाच जायबंधी झाले. बाधा दूर झाली.

रांजणगाव विश्वनाथ चोपडेकर हा नाथभक्तमहाराजानंकडे आला.,”योग साधणे कठीण वाटते.तेव्हा व्यवहारात राहून परमार्थ कसा साधावा ते कृपा करून सांगावे.”, महाराजांनी ,दिनचर्या नित्य नियमात कशी ठेवायची ते सांगून गृहस्ताश्रमिना भक्तीचा मार्ग दाखवला.

श्री माधवनाथ महाराजांनी भक्तांना नित्यनियम,मानसपूजा,नामजप,गुरुगीता या बद्दल वेळोवेळी मार्गदर्शन केले.


ही जळगाव जवळ असलेल्या कानळदे येथील कण्वश्रम गुंफा! येथे बसून नाथांचा राम म्हणजे नाथसुत रामचंद्र, नारायण कुलकर्णी यांनी “श्रीमाधवनाथ दीपप्रकाश “ या ३५ अध्यायांच्या.ओवीबद्ध नाथचरित्र ग्रंथाचे लेखन ४१ दिवसात पूर्ण केले.लेखनकाल-इ.स.१९२१.