मंदिराचा इतिहास व बांधकाम:-

नाशिक येथील विहितगाव नाशिकरोड येथे श्री माधवनाथ मंदिर आहे.

     श्री बाळासाहेब काशिनाथ जोशी यांनी ९/९/२००९ रोजी श्रींच्या मंदिरासाठी लॅमरोड विहितगाव येथे जागा खरेदी केली.श्री संजयजी नामजोशी (इंदोर) यांच्या प्रेरणेने त्या साडे पाच गुंठ्याच्या जागेवर श्री माधवनाथ महाराजांचे भव्य मंदिर बाळेश्वर या दगडात साकार झाले आहे.याकामी श्री माधवनाथ सेवा मंडळ व परिसरातील नाथ भक्त परिवार यांचा खूप आर्थिक व श्रमाचा हिस्सा आहे.

श्री नाथ मंदिर परिसर(संरक्षण भिंत) लांबी ९६’ व रुंदी ५८’ असून मंदिर प्लिंथ ५’ उंच, ५४’ लांब व ३९’ रुंद आहे.मुख्य गाभारा १२’ * १४’ असून कळसाची उंची जमिनिपासून ४५’ आहे.सभागृह ४१’ * २४’ असून गाभाऱ्याच्या दक्षिण उत्तर दोन्ही बाजूस १२’ * १४’ रुंदीचे दोन प्रशस्थ रूम असून एक रूम मध्ये संस्थेचे कार्यालय,लायब्ररी व दुसऱ्या रूम मध्ये श्रीनाथांची गादी स्थापन केली आहे. मंदिराच्या समोर बाहेरील व आतील भागात गुलाब, मोगरा,पारिजातक,जास्वंद,कर्दळी अशी विविध प्रकारची फुले बहरली आहे.

मंदिराचे शेजारील बाजुस दक्षिण दिशेस २ मजली सर्व सुखसोयींनी अदयावत असे बाहेर गावाहून येणाऱ्या भक्तांसाठी भक्तनिवास बांधले आहे. अवघ्या १५ महिन्यात हे सर्व काम पूर्णत्वास आले.

असंख्य नाथ भक्तांच्या देणगी रूपाने श्री माधवनाथ सेवामंडळाच्या अथक परिश्रमाने आणि आर्किटेक श्री जयवंत पवार,इंजि. श्री कृष्णा पवार व इंजि.श्री सागर बाळकृष्ण जोशी यांच्या सततच्या मार्गदर्शनाने आज भव्य मंदिर साकार झाले ही श्री नाथांचीच कृपा.

||श्री नाथ जय नाथ जय जय नाथ||