नुतनीकरण:-

     साधारणता सन २००९ साली श्री बाळासाहेब काशिनाथ जोशी यांनी माधवनाथांच्या मंदिरासाठी लॅमरोड विहितगाव येथे जागा खरेदी केली.श्री संजयजी नामजोशी (इंदोर) यांच्या प्रेरणेने त्या साडे पाच गुंठ्याच्या जागेवर श्री माधवनाथ महाराजांचे भव्य मंदिर बाळेश्वर या दगडात साकार झाले आहे.याकामी श्री माधवनाथ सेवा मंडळ व परिसरातील नाथ भक्त परिवार यांचा खूप आर्थिक व श्रमाचा हिस्सा आहे.

असंख्य नाथ भक्तांच्या देणगी रूपाने श्री माधवनाथ सेवामंडळाच्या अथक परिश्रमाने आणि आर्किटेक श्री जयवंत पवार,इंजि. श्री कृष्णा पवार व इंजि. श्री सागर बाळकृष्ण जोशी यांच्या सातत्त्याच्या मार्गदर्शनाने आज भव्य मंदिर साकार झाले ही श्री नाथांचीच कृपा.

श्रीमाधवनाथ संस्थान विश्र्वस्त मंडळ हे मंदिराचे व्यवस्थापण वजिर्नोध्दार उत्तम तऱ्हेने सांभाळीत आहे. त्यामुळे मंदिराचे नाजुक नक्षीकाम आज ही आपण अगदी नव्यासारखे पाहू शकतो.