मंदिरात साजरे होणारे वार्षिक उत्सव

नाथषष्टी म्हणजे नाथांचा निर्वाण दिवस.नाथषष्टी हा मार्च महिन्यात साजरा होतो.या कार्यक्रमाच्या वेळी सर्व नाथभक्त एक दिवसाचे सामुहिक दीप-प्रकाश पारायण करतात.दुसऱ्या दिवशी पहाटे काकड आरती होते त्यानंतर अवतरनिका,पंचपदी,व आरती होते.नंतर दुपारी १२ ते ४ महाप्रसाद असतो.

पाडवा म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदा या दिवशी नाथ महाराजांचा जन्म झाला.या दिवशी नाशिक,नागपूर,अकोला,इंदोर,पुणे सर्वत्र नाथांचा जन्म दिवस मोठ्या उत्साहात साजरा होतो.या दिवशी सकाळी ७ वाजता नाथ मंदिरात गुढी उभारली जाते.त्या नंतर भजन तसेच नाथांचा जन्म अध्याय वाचला जातो. नंतर नाथांचा अभिषेक होतो.तसेच सर्व नाथ भक्तांसाठी अल्पोपहार असतो.

दत्तजयंती डिसेंबर महिन्यात साजरी होते.दत्तजयंतीच्या आधी ३ दिवस मंदिरात गुरुचरित्राचे पारायण होते.सर्व नाथभक्त सामुदायिक पारायण करतात.दत्त जयंतीच्या दिवशी संध्याकाळी दत्त जन्माचा सोहळा पार पडतो.८ ते १० महाप्रासादा चा कार्यक्रम असतो.

गुरूपोर्णिमा दर वर्षी आषाढ महिन्यात येते.या दिवशी नाथ मंदिरात सकाळी ६ वाजता काकड आरती होते. ७ वाजता नाथ महाराजांचा श्री बाळासाहेब जोशी यांच्या हातून अभिषेक व महापूजा होते.तसेच सर्व नाथभक्त श्रींची पूजा करतात. या दिवशी सर्व नाथ भक्तांसाठी महाप्रासाद असतो.

दरवर्षी नाथ मंदिरात कृष्ण जन्म साजरा केला जातो.या दिवशी सर्व भक्त सामुदायिकतेणे कृष्ण भजन करतात. रात्री १२ वाजता कृष्णाचा जन्म ,आरती व प्रसाद असतो.

Video