मूर्तीचे स्वरूप व वर्णन:-

     मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात श्री माधवनाथ महाराजांची ३' फुटाची भव्य व आकर्ष मूर्ती असून त्यांच्या मागील बाजूस श्री विठ्ठल रखुमाईची २’ उंचीची काळ्या पाषाणात मनोवेधक मूर्ती आहे. सभागृहात उजवीकडे श्री साईबाबांची द्वारकामाईत विश्रांती स्थितीत असलेली दुर्मिळ मूर्ती व डावीकडे श्री गजानन महाराज व गोपालकृष्णाची आकर्षक मूर्ती आहे. यासर्व मूर्ती मकराना जातीच्या पांढऱ्या दगडात जयपूर येथुन घडवून आणल्या आहेत.कारागीर भारत भूषण(राजस्थान) यांनी बनवलेले नक्षीदार प्रवेशद्वार व गाभाऱ्याच्या आतील बाजूस असलेले नक्षीदार घुमट हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस ३' उंचीचे २ द्वारपाल आहेत.श्री नाथांसमोर सभागृहात भव्य व रेखीव कासव आहेत.या सर्व मूर्तीची दिनांक २७/२/२०१२ रोजी विद्वान ब्रम्हरुंदांच्या मंत्रोक्त वेद्घोशात प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला या प्रसंगी श्री संजयजी नामजोशी,श्री मंगेश भागवत, व श्रीभालेराव तसेच परिसरातील ३००० नाथ भक्त उपस्थित होते.