नाथां बद्दल माहिती:-

     मल्हारदादा व मथुराबाई या धर्मप्रवण दाम्पत्याच्या पोटी श्री माधवनाथांचा जन्म झाला त्याच्या जन्मानंतर लवकरच मल्हारदादांचा मृत्यू झाला.१३ वर्षाच्या माधवने आसेतु हिमाचल यात्रा केली व ६ वर्ष हिमालयात तपश्चर्या केली.नंतर तो करवीला आला. माधवाने अनेक चमत्कार करून दाखविले होते त्यामुळे अनेकांची त्यांच्यावर श्रद्धा बसली आणि माधवाचे श्री माधवनाथ महाराज झाले.

भारतीय संतांच्या परंपरेतील सिद्धपुरुष,चित्रकुटचे(उत्तर प्रदेश) नाथसंप्रदायी मठाचे अधिकारी योगाभ्यानंद सद्गुरू श्री माधवनाथ महाराज(मार्च १८५७ ते मार्च १९३६) यांचे स्थान मोठे आहे.श्री माधवनाथांचे मुळ गाव नाशिक जिल्ह्यातील नाशिक-शिर्डी रस्त्यावरील पांगरी(ता. सिन्नर) हे होय.

जगाच्या पाठीवर अलौकिक दैवी सामर्थ्य असणाऱ्या व्यक्ती आज ही आहेत,अशा वंदनीय पुरुषात योगाभ्यानंद श्री माधवनाथ महाराज यांची गणना होते.ते नाथपंथानपैकी एक साक्षात्कारी श्री नाथ होते. मुळचे त्यांचे घराणे सिन्नर तालूक्यातील मौजे पांगरी हे आहे. वयाची पहिली १० वर्ष त्यांनी पांगरी येथे काढली.पांगरी येथील काशिनाथ मंदिर हे महाराजांचे उपासना स्थान होय.

ज्या पुण्यक्षेत्री चित्रकुट येथे माधवनाथांचा जन्म झाला तेथील काशिनाथ संप्रदायाच्या संस्थानच्या गादीवर विराजमान होण्याचा मान वयाच्या १० व्या वर्षी प्राप्त झाला हा अलौकिक योग होय.चित्रकुट करवी जवळील गुफेत श्री गुप्तनाथ यांच्या समाधी जवळ त्यांना गुरुमंत्र लाभला ज्ञान व वैराग्य प्राप्त झाले आणि नंतर त्यांनी भारत भ्रमण सुरु केले.काही क ाळ अज्ञातवासात घालवला.पुढे दैवी सामर्थ्य प्राप्त झाल्यावर जन कल्याणासाठी ते प्रकट झाले.अध्यात्मिक,सांस्कृतिक कार्य हा त्यांचकार्य हा त्यांचा जीवन उद्देश बनला.

आपल्या उपदेशाने,गुरुमंत्राने,कृपादृष्टीने त्यांनी अनेक दुखीतांचे जीवन उजळून टाकले.महाराजांचे विशेष भ्रमण मध्यप्रदेश,वऱ्हाड,विदर्भ,उत्तरप्रदेश,महाराष्ट्र अशा सर्व ठिकाणी झाल्याने त्यांचा भक्तगण फार मोठा आहे.अनेक ठिकानी त्यांचे वास्तव्य झाल्याने त्या त्या ठिकाणी त्यांची गादी तयार झाली.सर्वत्र त्याचा जन्मदिवस मोठ्या प्रमाणात साजरा होतो.ते नाथसंप्रदायी असले तरी त्यांनी योगावर भर न देता नामसंकीर्तने भजन-पुजन या कडे जनतेचे लक्ष वेधले.